जळगाव शहर

अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मूळजी जेठा महाविद्यालय विजयी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगु काना ठाकूर महाविद्यालय ( स्वायत्त) न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे हे नववे वर्ष असून, स्पर्धा महाराष्ट्रभर एकूण नऊ केंद्रांवर प्राथमिक फेरी स्वरूपात भरवली जाते. जळगाव केंद्राची स्पर्धेचे आयोजन समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांनी केले होते. रविवारी १२ नोव्हेंबरला व.वा. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेत एकूण नऊ एकांकिकांचे सादरीकरण झाले. समर्थ कला बहुउद्दिशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जाधव यांच्यातर्फे विजयी संघांना रोख पारितोषिकेही देण्यात आली होती.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष तथा माजी ग स अध्यक्ष मनोज पाटील, तसेच जोशी बंधू ज्वेलर्सचे संचालक विनीत जोशी व समर्थ कला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव, स्पर्धेचे परीक्षक राहुल वैद्य, दीपक पवार, स्पर्धा व्यवस्थापक अमोल खेर आदी पाहुणे उपस्थित होते.


स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पारितोषिक (चषक, प्रमाणपत्र व रोख ४०००/-) – कंदील मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव, द्वितीय (चषक, प्रमाणपत्र व रोख ३०००/-) – हायब्रीड प्रताप महाविद्यालय अमळनेर, तृतीय (चषक, प्रमाणपत्र व रोख २०००/-) – पेनकिलर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज नागपूर यांना प्रदान करण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अभिषेक कासार( कंदील) प्रथम, हर्षा राणे (सांबरी) द्वितीय., सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – सिद्धांत सोनवणे( कंदील) प्रथम, मयुरी धनगर( हायब्रीड) द्वितीय, कै.मालतीबाई हरी शुक्ल स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार – मयुरी धनगर (उमा- हायब्रीड) प्रथम, तेजसा सावळे (सुमी- कंदील) द्वितीय, कै.हरी दिगंबर शुक्ल स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट अभिनेता – लोकेश मोरे (दाशा-कंदील) प्रथम, अक्षर ठाकरे (पंढरी- हायब्रिड)द्वितीय अशी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक विशाल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश लांबोळे यांनी केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रवीकुमार परदेशी, भावेश पाटील, सागर सदावर्ते, मयूर भंगाळे ,अक्षय पाटील, पायस सावळे, प्रणिता शिंपी, श्वेतांबरी गरुड, शुभम सपकाळे, मोक्षदा लोखंडे, महेश कोळी, पूर्वा जाधव, समर्थ जाधव, रोहिणी निकुंभ, खुशबू सुतार, इत्यादींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button