बातम्या

शिव इतिहासाची मोडतोड करणार्‍या चित्रपटावर बंदी घाला – संभाजी ब्रिगेड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे विर दौडले सात’ या चित्रपटांमधुन जाणून-बुजून शिवइतिहासाची मोडतोड केली जात असल्याने शहरातील तहसील प्रशासनाला संभाजी ब्रिगेडने निवेदन देत या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली.

तर तालुक्यात आंदोलन
नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनानुसार वरील चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा इतिहास जनमानसांत चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे त्यामुळे तमाम शिवभक्तांची मने दुखावली जात आहे. या चित्रपटांवर कायमस्वरुपी बंदी आणावी व चित्रपटाचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड बोदवड तालुका आंदोलन छेडेल व होणार्‍या परीणामांना शासन जबाबदार राहील, असा इशाराही तहसीलदारांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे.

यांची निवेदनप्रसंगी उपस्थिती
निवेदन देताना मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शैलेश वराडे, संघटक गणेश सोनोने, उपाध्यक्ष गणेश मुलांडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक खराटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले, सचिव प्रशांत सुरडकर, वैभव माळी, पवन पाटील, अ‍ॅड.ईश्वर पाटील , सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button