जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । शहरातील मंदीरातील साहीत्य चोरी करणारा अट्टल गुन्हेगार २४ तासाच्या आता स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. दरम्यान, त्याच्याकडुन शहरातील आणखी काही चोरीच्या घटना उघड होऊ शकतात अशी माहिती असून आरोपीतांस यापुर्वी जळगांव शहर पोस्टे मंदीर साहीत्य चोरीच्या गुन्हयात १ वर्ष शिक्षा झालेली आहे.
बबनराव केवारे वय ६५ मुळ रा. खामगांव बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशन मागे जळगांव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जिल्हापेठ सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता, सदर गुन्हयात गजानन नगर जळगाव येथिल जागृत महादेव मंदीराचे साहीत्य चोरी झालेले असुन ती चोरी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश बबनराव केवारे वय ६५ मुळ रा. खामगांव बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशन मागे जळगांव येथे राहणारा याने केली आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.
त्यानुसार त्याचा शोध घेवुन योग्य ती कारवाई करा असे कळवील्या वरून पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, हरीष परदेशी सर्व नेमणुक स्था.गु.शा, अशांना आदेश दिल्याने सदर पथकाने रेल्वे स्टेशन मागील पुलाखालून ताब्यात घेतले आहे आरोपी नामे सुरेश बबनराव केवारे वय ६५ मुळ रा. खामगांव बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशन मागे जळगांव यांस गुन्हयाकामी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन जळगांव शहरातील आणखी काहीचोरीच्या घटना उघड होऊ शकतात तसेच वरील आरोपीतांस यापुर्वी जळगांव शहर पोस्टे मंदीर साहीत्य चोरीच्या गुन्हयात १ वर्ष शिक्षा झालेली आहे