⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | भारत जोडो पदयात्रा : रावेरातील शेकडो तडवी भिल्ल समाज कार्यकर्ते होणार सहभागी

भारत जोडो पदयात्रा : रावेरातील शेकडो तडवी भिल्ल समाज कार्यकर्ते होणार सहभागी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे. या भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी ही यात्रा येणार असून शेगावात या दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लोहारा पाल जिल्हा परिषद गटातील तडवी भिल्ल समाजाचे शेकडो राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ व नवयुवक कार्यकर्ते सोबत घेवून जाणार आहोत.

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या निमित्ताने तडवी समाजाचे कलिंदर सिकंदर तडवी (मा.जि.सदस्य) यांनी आपल्या परिसरातील जिल्हा परिषद गटातील अनेक लहान-मोठ्या गावात जाऊन व हजारों तरुण बांधवांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार समजावून पक्ष बांधणीसाठी अनेक वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहे. तसेच कालिंदर तडवी हे तडवी समाजातील जिल्हा परिषद चे माजी सदस्य तथा कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

राष्ट्रीय काँग्रेस चे बालपणी पासून कट्टर कांग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते अशी ओळख आहे. कलिंदर तडवी यांनी रावेर तालुक्यासह लोहारा पाल जिल्हा परिषद गटातील शेकडो राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह शेगाव येथील राष्ट्रीय काँग्रेस च्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह