संजय राऊतांना जामीन, युवासेना कॉलेज कक्षतर्फे जल्लोष
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । युवासेना कॉलेज कक्ष जळगाव महानगर तर्फे शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यामुळे शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतिशबाजी करून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी महापौर जयश्री महाजन, शिवसेना संघटक गजानन मालपूरे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रितम शिंदे, संदिप सूर्यवंशी, अमित जगताप, उमाकांत जाधव, भूषण सोनवणे, जयेश नेवे, रूतुजा चौधरी, गायत्री भोईटे, पृथ्वी ठाकूर, प्रविण भगत, यश लोढा, ऋषीकेश देशमुख, भावेश सोनवणे, सैफ मन्सूरी, कृष्णा राजपूत, विक्रम गायकवाड, कैवल्य कोळी, हुजैफा बागवान, आर्यन करोसीया, हर्षल पाटील, गौरव पाटील, पारस तायडे, सैफ मोमीन, यांच्या सह युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, “अखेर सत्याचा विजय झाला”, “ही ताकद कोणाची? शिवसेनेची” अशा विविध घोषणांमुळे परिसर दणाणून निघाला. महापौर जयश्री महाजन यांनी फटाके फोडून जल्लोष केला.