ठाकरेंच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभेत विजय मिळवला. यावेळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या मिळालेल्या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शुभेछांमुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातली एक महत्वाची राजकीय चर्चा म्हणजे, आमदार ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार. मात्र आता केवळ चर्चाच आहेत. या बाबत कोणीही कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एकनाथ शिंदे हे शुभेच्या देताना म्हटले होते कि, या निवडणुकीत राजकीय संस्कृती म्हणून आमच्या युतीने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुजा लटके यांना माझ्या शुभेच्छा आहेत. एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्यानंतर राज्यात वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणले होते कि, निवडणुकीआधीच भाजपला पराभवाचा अंदाज आला होता, पर्यायी त्यांनी निवडणूक लढली नाही. जमिनिवरचे प्रकल्प गुजरातले गेले आहेत. हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. याच बरोबर नोटाला एवढं मतदान कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बळ मिळाले आहे.