जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । शहरातील 24 वर्षीय तरुण विवाहिता टेलरकडे कपडे घेण्यासाठी गेल्यानंतर घरी न परतल्याने एमआयडीसी पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.
विवाहितेच्या पतीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली. शिरसोली प्र.न. गावातील बेपत्ता झालेल्या विवाहितेचा रंग गोरा, उंची 165 से.मी. असून तिने अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. हवालदार जितेंद्र राठोड पुढील तपास करीत आहेत.