भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा

ऑक्टोबर 27, 2022 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । आता नोटांवर असलेल्या फोटोवरून नवीन राजकीय वाद सुरु झाला आहे. गांधींजींच्या फोटोसह देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाचा फोटो लावण्यात यावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. आता नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली दोनशे रूपयांची नोट शेअर केली आहे.

shivaji maharaj note 1 1 jpg webp

आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी ‘ये परफेक्ट है’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला नवं वळण लागलं आहे. केजरीवाल यांच्या या विधानाचा संबंध थेट गुजरात निवडणुकीशी लावला जात असून केजरीवाल गुजरातमध्ये हिंदुत्वाचं कार्ड खेळणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

shivaji maharaj note

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now