महाराष्ट्रराजकारण

राज्यातील अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या : शिंदे देणार ठाकरेंना अजून एक धक्का

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिंदे फडणवीस सरकार सरकारला ठाकरेंना मोठे धक्के देत आहे. यातच आता अजून बदल्या होणार आहेत असे म्हटले जात आहे. येत्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह मंत्रालयातील सचिव आणि इतर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिवाळी संपल्यावर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय फेरबदल होणार आहेत. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील मोठ्या महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी इत्याही पदावर मोठे फेरबदल होणार आहेत

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसह राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल होणार आहेत. यासोबतच मंत्रालयातील सार्वजानिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाचे अधिकारी, महसूल, गृह, वित्त, यादेखील बदल्या होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील पुणे , नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बदल्या होऊ शकतात. त्याचबरोबर पोलीस आयुक्त, डीआयजी, आयजी या पदांवर मोठे फेरबदल होण्याची आहे. पुढील काही दिवसातच या बदल्या होऊ शकतात.

Related Articles

Back to top button