महावितरण विद्युत सहाय्यक पदभरतीच्या २९ व ३० रोजी कागदपत्रांची पडताळणी

ऑक्टोबर 27, 2022 2:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।२७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रसिद्ध केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंळल निहाय २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

vij 1

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती.

परिमंळल निहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंळल निहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now