बायकोलाही जो माणूस साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला – आ.एकनाथराव खडसे

ऑक्टोबर 27, 2022 1:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । ‘बायकोलाही जो माणूस साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शाहाजीबापू पाटील यांना लगावला आहे.

khadse and shahji bapu patil jpg webp

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांना जोरदार टीका केली. यावेळी तो म्हणाले कि. बाबायकोला जो माणूस साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, अशा शब्दात खडसेंनी टीकास्त्र सोडलं आहे. बायकोला साडी घ्यायलाही पैसे नाही, असं वक्तव्य शहाजी बापूंनी केलं होतं. त्यावरून एकनाथ खडसेंनी शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या

शहाजी बापूंनी आपली पूर्वीची स्थिती सांगितली. शरद पवारांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही. त्यावेळी बायकोला साडी घेण्यासाठीही आपल्याकडे पैसे नव्हते, असं विधान शहाजी बापू पाटील यांनी केलं होतं. कदाचित ते गंमतीने केलं असेल, किंवा उद्वेगातून केलं असेल. पण आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला, असा टोला खडसेंनी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now