महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्ठा धक्का : लाखो प्रतिज्ञापत्र ठरणार निरुपयोगी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ ।शिवसेना कोणाची ? हे सिद्ध करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये चुरस रंगली आहे. यामुळे दोन्ही गटांतर्फे निवडणूक आयोग समोर प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला असून निवडणूक आयोग अडीच लाख प्रतिज्ञापत्र ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरवू शकतो असे म्हटले जात आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्र जमा केली होती. मात्र,उद्धव ठाकरेंच्या गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश आलं आहे. ही प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ही प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याची माहिती समोर येत आहे

Related Articles

Back to top button