भुसावळात चार हजार किटचे आमदारांच्या हस्ते वितरण

ऑक्टोबर 24, 2022 12:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय व केसरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना शिंदे – फडणवीस सरकारकडून दिवाळीच्या निमित्ताने रेशनचे आनंदाचा शिधा हे धान्याचे किट शनिवारी आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.

AMDAR 1 jpg webp

शहरातील पाच रेशन दुकाने तर ग्रामीण भागातील चार अश्या नऊ अंत्योदय व केसरी रेशन कार्ड धारकांना शनिवारी भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे यांच्या हस्ते रेशन किटचे वितरण करण्यात आले. भुसावळ शहर व ग्रामीण भागातील 39 हजार कार्डधारकांची मागणी केली होती. तहसील कार्यालयाने राज्य शासनाकडे मागणी केली होती. तर त्यात पहिल्या दिवशी चार हजार लाभार्थींना किटचे वितरण करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now