⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने घरगुती गॅस व्यासायीक हंडीमध्ये भरून काळाबाजार करणार्‍या तरुणाला अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमरान शेख समद (वय 38, रा.रथ चौक जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव तोल काट्यासमोर परीसरात बेकायदेशीररीत्या जीवनावश्यक घरगुती वापराचे एल.पी.जी. गॅस सिलेंडरमधील गॅस हा बेकायदेशीररीत्या व्यावसायीक वापराच्या मोठ्या (कमर्शियल सिलेंडर) हंडीमध्ये भरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलि निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी कारवाईशे आदेश दिल्यानंतर पथकाने इमरान शेख समद (38, रा.रथ चौक, जळगाव) याला अटक केली. संशयीताकडून घरगुती वापराचे चार सिलिंडर तसेच कमर्शियल वापराचे सहा सिलेंडर अवैधरीत्या गॅस भरण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रीक मोटार, गॅस पंपाच्या नळ्या, ईलेक्ट्रीक वजनकाटा आदी मिळून 25 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह