मोठी बातमी : गाळेधाकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ऑक्टोबर 19, 2022 1:38 PM

जळगाव लाईव्ह न्युज । १९ ऑक्टोबर २०२२ । पाचोर्‍याचे मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील गाळेधारकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

galedharak jpg webp

यावेळी उपाध्यक्ष राजस कोतवाल, माजी नगरअध्यक्ष पांडुरंग काळे, उपाध्यक्ष तेजस देपुरा, राजेंद्र अण्णा पाटील (पाचोरा), सुरेश आबा पाटील हे देखील उपस्थित होते. प्रसंगी १३ सप्टेंबर २०१९ रोजी च्या नियमावली संदर्भात पाच सदस्यांची समिती तर्फे सादर केलेला अहवाला बाबत लवकर निर्णय व्हावेत व सर्व महाराष्ट्रातील गाळेधारकांच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या.

तसेच महानगरपालिकेतर्फे ८१ क संदर्भात कारवाई करण्याची जी भूमिका घेतली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या व गाळेधारकांना दिलासा दिला. गाळेधारकांच्या तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला व ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भातले निवेदन संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now