ईगतपुरी मेमू आज व उद्या रद्द : आठ गाड्या उशिराने धावणार

ऑक्टोबर 18, 2022 9:50 AM

जळगाव लाईव्ह न्युज । १८ ऑक्टोबर २०२२ ।  चाळीसगाव रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिजचा गर्डरचे काम मंगळवार, 18 रोजी करण्यात येणार असल्याने गाडी क्रमांक 11120 भुसावळ-ईगतपुरी मेमू ट्रेन मंगळवार, 18 रोजी तसेच गाडी क्रमांक 11119 ईगतपुरी-भुसावळ मे बुधवार, 19 रोजी रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, गर्डर कामामुळे आठ गाड्या उशिराने धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

train 1

या गाड्या धावणार उशिराने
11078 जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस वाघळी स्टेशनवर 08.15 ते 11.25 दरम्यान थांबवण्यात येईल तसेच 12142 पाटलीपूत्र-एलटीटी कजगाव स्टेशनवर सकाळी 8.30 ते 11.25 वाजेदरम्यान तसेच 15065 गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस गाळण स्टेशनवर 8.40 ते 11.25 दरम्यान, 11056 गोरखपूर-एलटीटी पाचोरा स्टेशनवर 8.45 ते 11.25 वाजेदरम्यान, 12780 निजामुद्दीन-वास्को माहिजी स्टेशनवर 9.50 ते 11.25 वाजेदरम्यान, 15018 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस शिरसोली स्थानकावर 10.25 ते 11.25 वाजेदरम्यान 15646 गुवाहाटी-एलटीटी एक्स्प्रेस जळगाव स्टेशनवर 10.40 ते 11.25 वाजेदरम्यान थांबवण्यात येणार आहे.

डाऊन लाईनवर या गाड्या धावणार उशिराने
20103 एलटीटी-गोरखपूर हिरापूर स्टेशनवर सकाळी 10.35 ते 11.25 दरम्यान, 22129 एलटीटी-प्रयागराज न्यायडोंगरी स्टेशनवर सकाळी 10.40 ते 11.25 वाजता, 12839 सीएसएमटी-हावडा पिंपरखेड स्टेशनवर 10.50 ते 11.25 वाजेपर्यंत तसेच 12779 वास्को निजामुद्दीन नांदगाव स्टेशनवर 11 ते 11.25 वाजेपर्यंत थांबवण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now