दारूच्या नशेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा जेरबंद

ऑक्टोबर 17, 2022 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात एक अल्पवयीन मुलगी घराबाहेर झाडू मारत असताना एक मद्यपी तरुणाने तिची छेड काढून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.

caught jpg webp

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात १५ वर्षीय विद्यार्थिनी कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास विद्यार्थिनी घराबाहेर झाडू मारत असताना तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख हा दारूच्या नशेत आला. विद्यार्थिनीला डोळा मारत तिला जवळ ओढून लज्जास्पद कृत्य केले.

पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख रा.तारगल्ली, तांबापुरा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अल्ताफ पठाण आणि किशोर पाटील यांनी संशयीत तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख रा.तारगल्ली, तांबापुरा याला अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गिरासे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now