कुंभारटेकडीतील तरुणी बेपत्ता

ऑक्टोबर 16, 2022 3:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील कुंभारटेकडी येथील १८ वर्षीय तरुणी शिवण क्लासला जावून येते असे सांगून गेली. मात्र, ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon 2022 10 16T150118.470 jpg webp

यावल शहराला लागून असलेल्या कुंभारटेकडी परिसरात राहणारी सपना रघुनाथ कुंभार (वय १८) ही तरूणी तिचे वडील पाळधी ता.धरणगाव येथे काही कामा निमित्ताने गेले असता कुंभारटेकडी यांच्या घरी त्यांची पत्नी मुलगा व मुलगी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी सपना कुंभार ही शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शिवण क्लासला जाते असे आईला सांगुन गेली. सायंकाळी उशीरापर्यंत तरूणी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. रविवारी १६ ऑक्टोबर रोजी तरूणीच्या नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली.

त्यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालक बाऱ्हे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now