..मग टपरीवाले दादा अशी टपरी भाषा का करता तुम्ही, सुषमा अंधारेंचा ना. गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्ला!
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी ना. गुलाबराव पाटलांवर ‘मी पानटपरीवाला होतो. मी पानटपरीवाला होतो, मी टपरी चालवत होतो. मला मातोश्री आणि बाळासाहेबांनी मोठं केलं’. टपरीवाल्यांना एवढ्या मोठ्या मंत्रीपदावर बसवलं. मग, टपरीवाले दादा अशी टपरी भाषा का करता तुम्ही, असे म्हणत गुलाबराव पाटील यांच्यावरही सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली.
याच बरोबर अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांचा जुना विडीयो लोकांसमोर लावला. यावेळी कल्याणच्या सभेत एकनाथ शिंदें थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यावेळी, भाजपकडून होणाऱ्या अन्यायावर त्यांनी भाष्य केलं होतं. तसेच, मी अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. मी एक शिवसैनिक आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलंले होते.
हा व्हिडिओ दाखवल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारला. हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आणि यावेळी एकच हश्या पिकला.