⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | 15 दिवसांच्या मेगा ब्लॉकमुळे भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द, काही गाड्यांच्या मार्गात बदल

15 दिवसांच्या मेगा ब्लॉकमुळे भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द, काही गाड्यांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । रेल्वेनं प्रवास करणाऱ्या भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई- दिल्ली रेल्वे मार्गावर असलेल्या पलवल येथे पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईवरुन भुसावळामार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वेने उत्तर रेल्वेमधील पलवल स्टेशनच्या यार्ड आणि फ्रेट कॉरिडॉरच्या न्यू पृथला रेल्वे स्थानकादरम्यान साडेसहा किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर आज म्हणजेच 29 ऑगस्टपासून सिग्नलिंगचे काम सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे जवळपास 70 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात या मार्गावरून धावणारी मुंबई – अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस, भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस रद्द केली आहे.

रद्द केलेल्या गाड्या अशा
११०५७ मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस ३ ते १५ सप्टेंबरपर्यंत रद्द असणार आहे.
११०५८ अमृतसर – मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस ६ते १८ सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.
१२४०५ भुसावळ – हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस ८ ते १७ सप्टेंबर
१२४०६ हजरत निजामुद्दीन – भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस ६ ते १५ सप्टेबरपर्यंत रद्द राहील.

काही गाड्यांचे मार्ग बदलले
मेगा ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या ६ गाड्यांना बसला आहे. त्यांचे मार्ग बदलले आहेत. यात मुंबई – फिरोजपूर एक्स्प्रेस ५ ते १६ सप्टेंबरपर्यंत मथुरा, अलवर, रेवारी, अस्थल बोहार मार्ग वळवली जाईल. १२१३८ फिरोजपूर मुंबई ही गाडी याच मागनि धावेल. एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १५ सप्टेंबरला आग्रा, मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्गाने जाईल. तर हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेस ६ ते १७ सप्टेबर या काळात गाझियाबाद, मितावादी, आग्रा मार्गे धावेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.