जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव येथे भारतीय कोळी सेनेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करीत संघटनेचे सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. संघटनेचे कार्य व उद्देश या बाबत समाज बांधवांना माहिती देण्यात आली व राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते सदस्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
देशात व राज्यात विखुरलेल्या कोळी समाजाला संघटीत करण्याच्या दृष्टीने किनगाव गाव येथे भारतीय आदिवासी कोळी सेनेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष शारदा शामकांत महाले यांची उपस्थिती होती व त्यांच्या हस्ते संघटनेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. ग्रामीण भागात आदिवासी कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे व या समाजाला संघटनेच्या माध्यमातुन संघटीक करण्या करीता सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे.
या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप साळुंखे, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी, महिला जिल्हा उपाध्यक्ष रजनी तायडे, जिल्हा संघटक चारू सोनवणे, जिल्हा युवा अध्यक्ष गणेश साळुंखे, सुनील कोळी, यावल तालुका महिला अध्यक्ष राजमाला सपकाळे, शामराव कोळी, गणेश कोळी, अनिता सपकाळे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष साळुंखे, किनगावचे माजी उपसरपंच बबलू कोळी, श्रावण कोळी, शांताराम कोळी, विजय सपकाळे, रवींद्र कोळी, जगदीश कोळी सह मोठ्या संख्येत समाज बांधव या कार्यक्रमात उपस्थित होते गावातुन मोठ्या संख्येत सदस्य नोंदणी करीत नवनियुक्त सदस्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.