एवढे नाटक करण्याची एकनाथ खडसे यांना गरज काय? – मंत्री गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । जिल्हा दूध संघातील चोरी, अपहार प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी तब्बल १५ तास जळगाव शहर पोलिस ठाण्या बाहेर ठिय्या आंदोलन केले . ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतीलच, त्यामुळे पाच-सहा दिवस वाट बघायला हवी. त्यासाठी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी एवढे नाटक करण्याची एकनाथ खडसे यांना गरज काय? असा प्रश्न भाजप नेते गिरीश महाजन यांनी विचारला याच बरोबर दूध संघाच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत असेही महाजन म्हणाले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन म्हणाले कि, आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील गैरव्यवहाराबाबत सुरवातीला तक्रार दिली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना सुचले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. यामुळे पोलीस चौकशी करत असतानाही गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांचे नाटक सुरू आहे. याचबरोबर जिल्हा दूध संघातून एक ते दोन कोटी रुपयांचा एवढा माल बाहेर गेलाच कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दूध संघाचे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक यांच्या संमतीशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या जाबजबाबानंतर सर्व गोष्टी समोर येतील. पाच-सहा दिवस वाट बघायला हवी होती, सर्व समोर येणारच आहे. त्यासाठी एवढे नाटक करण्याची कोणतीही गरज नव्हती.असे गिरीश महाजन म्हणाले.