⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; थांबलेला मान्सून उत्तर महाराष्ट्रातून या आठवड्याच्या अखेरीस परतणार

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; थांबलेला मान्सून उत्तर महाराष्ट्रातून या आठवड्याच्या अखेरीस परतणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । सध्या राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसाने झालं आहे. दरम्यान, अद्यापही राज्यातील विविध भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातून थांबलेल्या मान्सून या आठवड्याच्या अखेरीस परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

IMD च्या दिलेल्या माहितीनुसार, वायव्य आणि उत्तर भारतात परतीच्या पाऊस पूर्णपणे थांबेल. तसेच 14-15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून पाऊस थांबणार असल्याचे सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरात मध्यवर्ती भागावर असलेल्या हवेच्या दाबामुळे 10 ते12 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत हवेच्या दाबाचा हा पट्टा पश्चिम किंवा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. हा पट्टा दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि आसपासच्या भागातून पुढे जाऊ शकतो.

दरम्यान, आजही राज्यातील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.  कोकण, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसात झालेल्या परतीच्या पावसाने शेती पिकानं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान झाले. अशातच आता परतीचा मान्सून या आठवड्याच्या अखेरीस परतण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.