सकल मराठा समाजाच्या उपोषणला राष्ट्रवादी नेत्यांचा पाठिंबा
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । निलंबित पोलीस निरीक्षक बकालेला तत्काळ अटक करावी व बडतर्फ करावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आहे. या उपोषणाला जिल्हा बँकेच्या चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महसूल मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज पाठिंबा दर्शविला.
सकल मराठा समाजाच्या ५२ संघटनांचा साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस असून अनेक मान्यवरांनी या उपोषणाला प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. आज या उपोषण स्थळी दुसऱ्या दिवशी मराठा प्रीमियर लीग संघटना व मराठा सेवा संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. बकाले याला अटक होईपर्यंत विविध संघटना रोज उपोषणाला बसणार आहेत. सदर उपोषणस्थळी मराठा सेवा संघाचे राम पवार राष्ट्रवादीचे वाल्मीक पाटील, भाजपाचे कैलास सोनवणे, विनोद देशमुख , अशोक लाडवंजारी , सुनील माळी, सुनील पाटील, हिरामण चव्हाण, मंगलाताई पाटील ,उमेश नेमाडे, पुरुषोत्तम चौधरी, अनिरुद्ध जाधव ,भरत कर्डिले अनिल पवार, प्रफुल पाटील, रमेश बहारे, राहुल पवार, सुशील शिंदे, धनराज माळी, नाटेश्वर पवार, सुनील गरुड आदी पदाधिकारी उपस्थित होते.