⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनीच्या कश्ती-अंतराग्नी सोहळ्याचे थाटात उद्घाटन

रायसोनीच्या कश्ती-अंतराग्नी सोहळ्याचे थाटात उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कश्ती-अंतराग्नी या शीर्षकाखाली सुरु झालेल्या तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलन उद्घाटन सोहळा आज रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या स्नेह संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमाची माहिती दिली तसेच त्यांनी विध्यार्थ्यांना यावेळी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागानुसार तयार केलेल्या विध्यार्थी उपक्रम पुस्तिकाचे प्रकाशन प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अभियांत्रिकीचे ऑकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

२६ ते २८ एप्रिल दरम्यान आयोजित या स्नेह संमेलन कार्यक्रमांमध्ये, रांगोळी स्पर्धा, नृत्य, गीत गायन, कल का नायक, केस स्टडी, अंताक्षरी, फेस पेंटिंग, पोस्टर सादरीकरण मिस मॅच डे, साडी ऑड टाय डे, अंताक्षरी, ट्रेडीशनल डेचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा फेस पेंटीग व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विध्यार्थ्यानी मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, अशी विविध बहारदार गीते विध्यार्थी स्पर्धकांनी सादर केली तसेच प्रेक्षक विद्यार्थ्यांनी विविध गीतांचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी परीक्षक म्हणून माजी विद्यार्थी श्रुती जोशी,ओम जीवानी, विकी सोनवणे यांनी काम पहिले. सदर स्नेहसंमेलनासाठी प्रा.डॉ.राजकुमार कांकरिया, प्रा.वसिम पटेल यांनी समन्वयकाची भूमिका बजावली तर प्रा.राहुल त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.रफिक शेख, प्रा.कल्याणी नेवे, प्रा.तन्मय भाले, प्रा.स्वाती पाटील प्रा.बिपासा पात्रा, प्रा.प्रिया टेकवानी, प्रा.मयुरी गचके, प्रा.विनोद महाजन, प्रा.प्रतीक्षा जैन, प्रा.रुपाली नेवे, प्रा.प्राची जगवाणी आदींनी सहकार्य केले

author avatar
टीम जळगाव लाईव्ह