क्रूरता : मध्यरात्री घरात घुसून बिर्याणी खाऊन केला २ महिन्याच्या चिमुकलीचा खून!

ऑक्टोबर 12, 2022 6:16 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायला तयार नाहीय, चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथील इंदिरानगर भागात कोयत्याचा धाक दाखवून दोन महिन्याच्या चिमुकलीचा रूमालाने तोंड दाबून खून केल्याची घटना ११ ऑक्‍टोंबरला रात्री दहाच्‍या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत एका विरोधात दाखल करण्यात आला आहे. 

jalgaon 2022 10 12T181607.981 jpg webp

तालुक्यातील पिंप्री प्र.दे. येथील शोभना सोनु ठाकरे (कोळी) (वय 27) ही महिला पती, मुले व आजोबांसह राहते. तिचा पती मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवतो. दरम्‍यान ११ ऑक्‍टोंबरला रात्री दहाच्‍या सुमारास शोभना हिचे पतीशी घर खर्चाला पैसे देत नाही; यावरून किरकोळ वाद झाला. या वादातून दोघे पती–पत्नी जेवण न करता झोपुन गेले. यानंतर आज १२ऑक्‍टोंबर पहाटे दोन वाजेच्या सुमारास शोभना हिला घरात कुणीतरी आल्याचा आवाज आला. तेवढ्यात मागच्या दारातून एक व्यक्ती येतांना दिसला. त्याच्या हातात लोखंडी कोयता होता.

दरम्यान, गावातीलच अरविंद कैलास पाटील (वय 40) हा असल्याचे शोभनाने ओळखले. त्याने शोभनाच्या जवळ येत कोयत्याचा धाक दाखविला. आरडाओरड करू नको, तुला जीवंत सोडणार नाही; अशी धमकी दिली. त्याचवेळी त्याने पातेल्यातील बिर्याणी ताटात घेऊन खाण्यास सुरवात केली. तेवढ्यात उठून महिलेकडे कोयता उगारून त्याने खिशातील रूमाल काढला व मुलगी गुंजन सोनु ठाकरे (वय 2 महिने) हिच्या तोंडावर जोरात दाबून ठेवला. घाबरलेल्या शोभनाला काय करावे काहीच सुचत नव्हते. अरविंद हा घराबाहेर पळू लागल्याने शोभना हिने पतीला उठवून तो गुंजनला मारून पळाला; असे सांगितले. त्यावेळी सोनु ठाकरे हा अरविंदचा पाठलाग केला पण सापडला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now