⁠ 
रविवार, जानेवारी 5, 2025
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | मुसळधार पावसाने घर कोसळले, सुदैवाने प्राणहानी टळली

मुसळधार पावसाने घर कोसळले, सुदैवाने प्राणहानी टळली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कधी कमी तर कधी जोरदार सुरु आहे. भुसावळ शहरात मंगळवारी पहाटे सहा वाजेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे यावल रोडवरील राहूल नगरात घर कोसळले. मात्र, सुदैवाने प्राणहानी टळली तर ड्रेनेज चोकअपमुळे तापीनगरातील महादेव हनुमान मंदिराजवळील दोन घरांमध्ये पाणी शिरले. शहरातील सेंट अलॉयसीस शाळेच्या परीसरासह अनेक शाळांच्या मैदानांवर पाणी साचल्याचे चित्र होते.

भुसावळ शहरात मंगळवारी सकाळी सहा ते आठ या दरम्यान 58.8 मिली पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील राहुल नगरातील शामराव रामदास वानखेडे यांच्या मालकिच्या व सारीका सुधीर सावंत हा परीवार भाड्याने राहत असलेले घर कोसळून वित्तहानी झाली तसेच शहरातील तापीनगर भागात पालिका जलशुध्दीकरण केंद्राच्या ड्रेनेज चोकअप झाल्याने महादेव – हनुमान मंदिराच्या परीसरातील दोन घरांमध्ये पाणी शिरल्याचे सांगण्यात आले.

शहरातील गजानन महाराज नगरातील कोटेचा माध्यमिक शाळेच्या मैदानातून पाण्याचा निचराच होत नसल्याने मैदानाला तळ्याचे स्वरुप आले. दरम्यान, खडका रोडवरील सुभाष चौकी ते महामार्गावरील खडका चौफुलीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले असलेतरी पावसामुळे रस्त्याची जैसे थे अवस्था झाली आहे. तालुक्यात काही पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह