हिंगोली येथे होणार ५८ वी खो-खो

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । हिंगोली येथे होणाऱ्या ५८ वी पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी शुक्रवारी (ता.७) सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडासंघाच्या मैदानावर घेण्यात आली.

निवड चाचणीसाठी जिल्हाभरातून ४० मुले व २० मुली सहभागी झाले होते. निवड चाचणी प्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशू पोळ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तांत्रिक समिती सदस्य अनंता सैंदाणे, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव राहुल पोळ, दत्तात्रय महाजन, एस पी महाजन (बिडगाव),देविदास महाजन (धानोरा), दिलीप चौधरी, विशाल पाटील (पाचोरा) यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक राज्य खो-खो पंच एस.पी. महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून निवड चाचणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंच म्हणून हेमंत ठाकूर, निरंजन ढाके, तुषार सोनवणे, महेश पाटील यांनी काम पाहिले. निवड चाचणीच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले.







