शिंदे गटातील आमदार ‘या’ कारणामुळे प्रचंड नाराज!

ऑक्टोबर 11, 2022 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले गेल्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली, असे म्हटले जात आहे. शिवसेनेमध्ये बंड करुन एकनाथ शिंदे यांच्यासोहत ४० आमदार आणि १२ खासदार गेले आहेत. मात्र ते आता नाराज झाले आहेत असे म्हटले जात आहे.

eknath shinde sad jpg webp

शिंदे यांनी खरी शिवसेना आपली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगात गेला आहे. आयोगाने दोन्ही गटांना कागद पत्रे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर तात्पूरत्या स्वरुपात चिन्ह आणि नाव गोठवले गेले आहे. शिंदे गटातील नेत्यांना शिवसेनेचे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास वाटत होता.मात्र असे ना झाल्यानेच शिंदे गटात सर्व आलबेल नाही असे म्हटले जात आहे.

त्यातच आता आमदार मंत्रीपदाची तयारी करत आहेत असे म्हटले जात आहे, यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या ४० आमदारांना संधी देणे शक्य नाही. त्यावरुन काही आमदार नाराज होतील, त्यामुळे विस्तार पुढे ढकलायचा असा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now