विलास मोरे यांच्या बाल कादंबरीस ‘बाल साहित्य’ पुरस्कार जाहीर

ऑक्टोबर 10, 2022 6:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा जि. कोल्हापूर चे राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून खान्देशातील बाल साहित्यिक विलास मोरे यांच्या ‘तिसरा डोळा’ या बाल कादंबरीला ‘बाल साहित्य’ राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त कादंबरीची इंग्रजी भाषांतरीत आवृत्ती दिलीपराज प्रकाशन, पुणे या संस्थेने प्रसिद्ध केलेली आहे. मराठी लेखकाची विज्ञान काल्पनिकतेवर आधारीत कादंबरी इंग्रजीत प्रसिध्द होणे ही बहुधा प्रथम घटना आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. १५ ऑक्टोबर रोजी ता. आजरा जि. कोल्हापूर येथे होणार आहे.

jalgaon 2022 10 10T182037.061 jpg webp

विलास मोरे यांची  सर्व साहित्य प्रकाराती एकुण १५ पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. तसेच त्यांना या पूर्वी महाराष्ट्र शासनाचा बाल कवी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यांची “पांढरे हत्ती काळे दात ” ही कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली असुन या कादंबरीची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रा. वा. ना आंधळे, प्रा. कैलास वानखेडे, शिवदास चौधरी, संजय साळी, हकीमोद्दीन बोहरी  माधवी कुळकर्णी – इनामदार, सुचिता जोशी -जामखेडकर  यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now