Muktainagar news- जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार (वय ४२, धंदा नोकरी) यांनी तक्रार दिली आहे. तर ५० वर्षीय महिलेने संशियत आरोपी पवार याने विनयभंग केल्याचा आरोप केला असून परस्पर विरोधी गुन्हे मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील एका गावातील ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार (वय ४२, धंदा नोकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुरामास ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत होते. यावेळी योगेश बाळकृष्ण मुळक आणि एक जण यांनी कार्यालयात येत योगेश पवार यांना शिवीगाळ केली. त्यांना शासकीय कार्यालयात शिवीगाळ करु नका असे म्हणताच योगेश मुळक याने योगेश पवार यांना पाठीमागून घरुन ठेवत शिवीगाळ केली तर दुसऱ्याने देखील शिवीगाळ करुन चप्पल ने तीन वेलेस योगेश पवार यांना गालावर मारले. तसेच बुक्याने पोटावर मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कार्यालयातील टेबलावर असलेले शासकीय काम करण्याचे कृती आराखडाचे कागदपत्र फाडुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीत, तालुक्यातील एका गावातील ५० वर्षीय महिलेच्या घरी जात विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालूक्यातील एका गावातील ५० वर्षीय महिलेच्या घरी जात तुझा पती आमच्या विरोधात अर्ज करीत आहे, आपण ते सर्व जमवून घेवू ते अर्ज मागे घेण्यास सांग असे म्हणत महिलेचा हात ओढत विनयभंग केला. याप्रकरणी संशयित आरोपी ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्रावण जवरे हे करीत आहेत.