⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मोठी बातमी : नावेतून प्रवास करीत उत्पादन शुल्क विभागाने उधळले गावठी दारूचे अड्डे!

मोठी बातमी : नावेतून प्रवास करीत उत्पादन शुल्क विभागाने उधळले गावठी दारूचे अड्डे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून आता उत्पादन शुल्क विभाग देखील सतर्क झालं असल्याचे पाहायला मिळते आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारु निर्मीती केंद्रांवर उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले. यात सुमारे २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खाजगी नावेतून प्रवास करीत ही धडक कारवाई केली आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कांतीलाल उमाप, संचालक, अं. व दक्षता सुनील चव्हाण, तसेच विभागीय उप आयुक्त अर्जुन ओहोळ नाशिक विभाग नाशिक, पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. मुंढे आणि अधीक्षक रा.उ.शु. जळगाव जितेंद्र गोगावले यांचे ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर महात्मा गांधी सप्ताह निमित्त गावठी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेशानुसार विभागीय निरीक्षक, सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ जि. जळगाव यांच्या पथकास मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारात पुर्णा नदीच्या पात्रातील बेटांवर, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार दि. ८ रोजी विभागीय निरीक्षक सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि. जळगाव यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पुर्णा नदीपात्रातील मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकुन एकुण ११९६० लि. रसायन, गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायनाचे प्लॅस्टीक व पत्री ड्रम मिळुन रु. २,६२,५००/- चा मुद्देमाल मिळुन आला. रसायन जागीच नाश करण्यात आले. घटनास्थळी कोणताही आरोपी मिळुन आला नसल्याने आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.

सदर कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक जालींदर, राजेश निं. सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, अमोद भडागे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिमा तपासणी नाका, पुर्णाड, तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख, गोकुळ अहिरे सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान सर्वश्री नितीन पाटील, योगेश राठोड, अमोल पाटील, भुषण परदेशी, नंदु नन्नवरे, विजय परदेशी आणि पोलिस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वी रित्या पार पाडली. गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक, सुजित ओं. कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश निं. सोनार आणि दुय्यम निरीक्षक अमोद भडागे हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह