शिरसोलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

ऑक्टोबर 7, 2022 6:55 PM

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । तालुक्यातील शिरसोली येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

तालुक्यातील शिरसोली गावातील इंदिरा नगरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वडील शेत-मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार, 6 ऑक्टोबर रोजी मुलगी शाळेत जावून येते, असे सांगून सकाळी सहा वाजता घरातून निघाली. दुपारीपर्यंत मुलगी घरी न आल्याने वडीलांसह तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आली नाही.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी करीत गुरुवारी रात्री नऊ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now