महाराष्ट्र
शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याला संधी मिळाली तर जाणार : नारायण राणे
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । मला जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे निमंत्रण मिळाले आणि भाजपने उपस्थित राहण्याची अनुमती दिली, तर मी बीकेसी येथील दसरा मेळाव्याला जाईन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
बीकेसी येथील एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार मिळत आहेत. तिथे होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे असेही राणे म्हणाले. मेळाव्याचे अद्याप मला आमंत्रण आलेले नाही; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे निमंत्रण मिळाले आणि भाजपने उपस्थित राहण्याची अनुमती दिली, तर मी बीकेसी येथील दसरा मेळाव्याला जाईन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.