⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

फक्त ‘या’ लोकांनाच नोटवापसीचा त्रास ; देवेंद्र फडणवीस याचे महत्वाचे वक्तव्य

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ ।  सध्या चलनात असलेली दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे. अश्यावेळी यामुळे खूप वाद प्रतिवाद सुरु झाले आहेत. आणि राजकीय वर्तुळात टीका टिप्पण्या सुरु झाल्या आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी जाहीर केली होती. देशातल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनी नोटा त्या दिवसापासून व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने ५०० आणि २,००० रुपयांच्या दोन नवीन चलनी नोटा बाजारात आणल्या होत्या. यापैकी २,००० रुपयांची नोट आता बंद करण्यात आली आहे.

एका वेळेस नागरिकांना केवळ 20 हजार रुपये म्हणजे दहा नोटा जमा करता येणार आहेत. बँकांना यासाठी विशेष काउंटर ची सोय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत या नोटा चलनात असणार आहेत मात्र त्यानंतर त्या चलनात राहणार नाहीत.

‘भ्रष्ट लोकांनाच नोटवापसीचा त्रास’ होणार असल्याचे बोलत ‘नोटा आल्या कुठून हे सांगावे लागणार’ असे खोचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.