चाळीसगावला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ऑक्टोबर 4, 2022 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । चाळीसगाव शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ४ ते ५ महिन्यापासून पाठलाग करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime girl rep

शहरातील एका परिसर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या ४ ते ५ महिन्यापासून शाळेत जाताना शुभम संजय पाटील हा नेहमी पाठलाग करत होता. तसेच ‘तू मला आवडतेस, माझ्यावर प्रेम करशील का?’, असे म्हणत नेहमी मुलीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत होता. तसेच मुलीचा भाऊ संशयिताला समजविण्यासाठी गेला असता त्याला फायटरने मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी शुभम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी सचिन कापडणीस हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now