रोझलँड इंग्लिश मिडीयममध्ये रेड कलर डे साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । रोझलँड इंग्लिश मिडीयम या शाळेत विद्यार्थ्यांना विविध रंगांची ओळख व्हावी म्हणून अनोख्या पध्दतीने दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ‘कलर डे ‘ साजरा करण्यात येतो. यात विविध रंगांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येते. यंदाच्या रेड कलर डे साजरा करण्यात आला.
कलर डे च्या निमित्ताने नर्सरी ते चौथी या प्राथमिक व माध्यमिक वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लाल रंगाबद्दल माहिती दिली. यामध्ये लाल रंगांच्या फळांबद्दल, फुलांबद्दल , भाज्याबद्दल त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या लाल टपाल पेटी, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक बंब इत्यादी बद्दलही विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कलर डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून, मुखवटे लाऊन रंगाबद्दल माहिती सांगितली. तसेच “नॉलेज इज पॉवर , “रक्त दान महादान” यांचे महत्व विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले, या रेड डे निमित्त संपूर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थ्यानी लाल रंगाचे कपडे परिधान करून मोठ्या उत्साहात रेड डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.