तरुणाला दिसले मेडिकल कॉलेजला नोकरीचे स्वप्न, मोबाईलवर आले नियुक्ती पत्र, पण..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । तरुणाला मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, नोकरी चे बनावट नियुक्ती पत्र मोबाईलवर पाठवून तब्बल ३ लाख ५० हजाराची फसवणूक केल्याची घटना घडलीय. याबाबत तरुणाचे जिल्हा पेठ पोलिसांत तक्रार दिली आहे.

शहरातील देवेंद्रनगरात वास्तव्यास असलेल्या ३७ वर्षीय तरुणाला आरोपी ( शिवशंकर लखन जवकर, नितु शिवशंकर जवकर रा. चांदमेटा मध्यप्रदेश) यांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील मेडिकल कॉलेग मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन तसे बनावटीचे नियुक्ती पत्र मोबाईलवर पाठवून तब्बल ३ लाख ५० हजाराची मागणी केली. आज पावतो आरोपीतांनी संगमंत करून तरुणाची नोकरी न लावता फसवणूक केली. या प्रकरणी तरुणाने जिल्हा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भा, कलम ४२०,४६७, ४६८,३४ प्रमाणे सदर आरोपी विरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय प्रदीप चांदेलकर करीत आहे.