गुन्हेजळगाव जिल्हा

खळबळजनक : सोशल मीडियात पोलीसदलाची बदनामी, अँडमीनसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ ।  ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर वृत्तपत्रात आलेली बातमी टाकण्यात आली. यावेळी ग्रुपवर पोलीस दलाची बदनामी करण्यात आली. या प्रकराची चॅटींग तिथे सुरु होती. याबाबत शनिपेठ पोलिसात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात पो.ना. अभिजित सैंदाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या गृपवर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४७ ते १२.५१ दरम्यान ‘ वृत्तपत्रात आलेल्या बातमी एकाने टाकली. त्यानंतर पोलीस दलाची बदनामी होईल अशी चॅटींग काहींनी सुरु केली. त्यानुसार माडवली हाथ तोडा १ लाख रुपये, पाय तोडा २ लाख रुपए, हाफ मर्डर करा ५ लाख रुपये, मर्डर करा १० लाख रुपये मंग पोलीस स्टेशन बंद करा” त्यावर अजून व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक ९८९०६३४०३४ बिच में दलाल कोण है.” पुन्हा ८०८७४४०९८७ याच क्रमांकावरुन “बीच में दलाल कोण है. भाई”अशी पोस्ट व्हॉयरल केली आहे. अॅडमीन क्रमांक १ ते ४ यांनी गृप त्यांच्या नियंत्रणाखाली असतांनाही पोस्ट व्हायरल होऊ दिली.

याप्रकरणी फारुख कादरी (पूर्ण नाव माहित नाही, ग्रुप ॲडमिन), सचिन धांडे (पूर्ण नाव माहित नाही, ग्रुप ॲडमिन), 9284843511 ( मोबाईल धारक, पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), 9404559510 (मोबाईल धारक, पूर्ण नाव माहित नाही ग्रुप ॲडमिन), शेख इरफान (पूर्ण नाव माहित नाही), नजीम (पूर्ण नाव माहित नाही) अशांविरुद्ध पोलीस अप्रचीतीची भावना चेतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button