जळगाव जिल्हा

विश्वरूद्र फाउंडेशन.. शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्काराचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । भारत सरकार नोंदणीकृत विश्वरूद्र फाउंडेशन संचलित विश्व ह्यूमन राइट्स, पोलीस मित्र, नारीशक्ती, पत्रकार व ग्राहक संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या तर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी संघ जामनेर भुसावळ रोड छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचा हॉल, ता. जामनेर जि. जळगाव येथे दि. 09 ऑक्टोंबर 2022, वेळ. 01:00 वाजता दुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्यातून 5 शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी प्रत्येक तालुक्यासाठी 1 पुरस्कार, माध्यमिक विद्यालयासाठी प्रत्येक तालुक्यातून 1 पुरस्कार, जिल्हा परिषद उर्दू शाळा तालुक्यातील प्रत्येक शाळेसाठी 1 पुरस्कार, तालुक्यातील इंग्लिश मीडियम शाळेतून 1 पुरस्कार, विशेष पुरस्कार म्हणून प्रत्येक तालुक्यातून 1 अशा प्रकारे तालुक्यातून 5 पुरस्कार देण्यात येणार आहेत.

यासाठी 2021 ते 2022 या वर्षांमध्ये आपण केलेल्या कामांची व विहित क्षेत्रात मिळालेल्या पुरस्कारांची शाळेसाठी व समाजासाठी केलेल्या कामांची पीडीएफ तयार करून किंवा नवीन शिक्षण धोरण विद्यार्थ्यांसाठी काही विशेष केला असेल तर त्याची माहिती पीडीएफ द्वारा सादर करावं सादर करण्यासाठी दि. 06 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पीडीएफ पोहचवावी. यातून शिक्षकांची निवड करून त्यांना कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी फोन केला जाईल, अशी माहिती विश्वरुद्र फॉउंडेशन संचलित विश्व ह्यूमन राइट्स, पोलीस मित्र, नारीशक्ती, पत्रकार व ग्राहक संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मार्गदर्शक, संचालक तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button