चाळीसगाव तालुक्यात पशुसंहार सुरूच सलग तिसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्‍ला

सप्टेंबर 30, 2022 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातीळ गिरणा परिसरात थैमान घातलेल्या बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. कारण बिबट्याने बुधवारी (ता. २८) रात्री लोंढे (ता.चाळीसगाव) शिवारातील पाटचारीलगत असलेल्या शेतात वासराचा फडशा पाडला. यामुळे या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

bibtya jpg webp

वरखेडे पाठोपाठ लोंढे शिवारात बिबट्याचे पशुधनावरील हल्ले सुरूच आहे. लोंढे येथे आठवडाभरात बिबट्याचा हा चौथा हल्ला आहे. लोंढे येथील देवराम चौधरी यांच्या पाटचारीलगत असलेल्या शेतात बिबट्याने वासराचा फडशा पाडला. यावेळी असे झाले कि, श्री. चौधरी शेताकडे गेले आज पहाटे असता वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. या भागातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.

 तर दुसरीकडे चाळीसगाव मालेगांव रस्त्यावर असलेल्या कळवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. वनविभागाने या घटनेला दूजोरा दिला आहे. गुरुवारी सकाळी वाहनाने जाणाऱ्या प्रवाश्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now