⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | दसरा आधीच सोने-चांदी महागली ; काय आहे आज जळगावातील दर?

दसरा आधीच सोने-चांदी महागली ; काय आहे आज जळगावातील दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । नवरात्रोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते. दरम्यान,जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याचा परिणाम आता भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आज व्यवहारातील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही धातूंमध्ये वाढ दिसून आलीय. त्यामुळे MCX वर सोने पुन्हा 50 हजारावर गेले आहे. Gold Silver Price Today

MCX वर सोने दर?
शुक्रवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, सकाळी 11 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 90 रुपयांनी वाढून 50,083 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुरुवारी, MCX वर सोन्याचे व्यवहार सकाळी घसरणीसह सुरू झाले, परंतु संध्याकाळपर्यंत ते वाढले आणि ते 0.50 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

चांदीचा दर
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात चांदीही वाढताना दिसत आहे. आज चांदीचा भाव 364 रुपयांनी वाढून 56,524 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. चांदीचा व्यवहार 56,400 रुपयांपासून सुरू झाला. काही वेळाने किंमत वाढून 56,550 रुपये झाली. पण मागणी कमी झाल्यामुळे किंमत घसरली आणि 56,524 वर आले.

जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदी महागली?
जळगाव सुवर्णनगरीत सोने आणि चांदीचा भाव वधारलेला दिसून आला. सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,670 रुपये इतका आहे. यापूर्वी 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,074 रुपये इतका होता. तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,950 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,300 रुपये इतका होता. दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 56,800 रुपयावर आला आहे. यापूर्वी तो 56,000 रुपये प्रति किलो इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.