शिक्षणाला हत्यार बनवा.. आयुष्यात हवं ते मिळेल!
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । शिक्षणाला हत्यार बनवा.. आयुष्यात हवं ते मिळेल असे प्रतिपादन प्रा.एस.के पुरोहित यांनी केली. नंदिनी बाई कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळ अंतर्गत ११वी व १२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींसाठी ‘करियर गायडन्स’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
तसेच जे काम करण्यात तुम्हाला आनंद वाटतो ते खऱ्या अर्थानं तुमचं करिअर असतं. तुमच्यातली ऊर्जा योग्य जागी लावा, ध्येय सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थिनींनी असेही प्रा.पुरोहित म्हणाले. या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या प्राचार्य सी.एस.पाटील, उपप्राचार्य एस.एस. नेमाडे, पर्यवेक्षक पी.व्ही. वाणी, समन्वयक प्रा.आर.डी वराडे उपस्थित होते. प्रा ललित भारंबे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन कु. समृद्धी शेळके व आभार प्रदर्शन सानिका पाटील हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा जयश्री नेमाडे , प्रा तीलोत्तमा राणे यांनी प्रयत्न केले.