⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | बोदवडला वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान..

बोदवडला वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bodvad News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । सप्टेंबर महिन्यात जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यात देखील येवतीसह जामठी तसेच तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, तालुका कृषी अधिकारी पाडवी, मंडळ अधिकारी पवार, कृषी सहायक मोरे, तलाठी उगले अप्पा, तलाठी रतनाळे, नगरसेवक गोलूभाऊ बरडिया, नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक नितीन चव्हाण यांनी नुकसानीची पाहणी करीत आमदारांना माहिती दिली. त्यानंता आमदार पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

यावेळी शेतकरी सुनील बडगुजर, अकबर मन्यार, युवराज परदेशी, प्रदीप तांगडे, सुभाष बडगुजर, राजु माळी, मनोज राजपूत, धनराज पाटील, खलील मन्यार, अरुण बडगुजर, नाना वंजारी, रहेमतुल्लाभाई मन्यार, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, सचिन माळी व गोपाल पाटील उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह