महाराष्ट्रराजकारण

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कुणाकडे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस पालकमंत्रीपदाचं वाटप रखडलं होतं. यावरून विरोधकांनी शिंदे, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर जोरदार टीका केली. अखेर शनिवारी पालकमंत्रीपदाच्या वाटपाला मुहूर्त मिळाला. शिंदे सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button