संतापजनक : अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार!

सप्टेंबर 24, 2022 3:09 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 10T104930.183 jpg webp

चाळीसगावच्या एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तिघांनी जणांनी संगनमत करून एका प्रार्थनास्थळाजवळ बोलावले व तेथून तिला दुचाकीवर बसवून औरंगाबाद रस्त्यावरील एका मक्याच्या शेतात नेले. यानंतर संशयीत आरोपी नाना गोरख आहिरे (रा.तळवाडे, ता.नांदगाव, जि.नाशिक) याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात नाना अहिरेसह अन्य दोन अनोळखी तरुणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय सागर ढिकले हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now