महाराष्ट्रराजकारण
बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्र्रात फिरते आहे – उद्धव ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । आज पर्यंत मी पोरं पळवणारी टोळी ऐकली होती. मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये बाप पळवणारी टोळी पाहत आहे. असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी एक मी खुर्ची मुद्दामून ठेवली आहे कारण की संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसाठी लढत आहेत. ते ‘मिंदे’ नाहीत. असे ठाकरे म्हणाले
याचबरोबर काही लोक माझा बाप चोरायला निघाले आहेत. आजपर्यंत पोरं चोरणारी टोळी ऐकली होती पण पहिल्यांदा मी आज बाप चोरणारे पाहतोय. असे उद्धव ठाकरे म्हणाले. याच बरोबर ज्यांना मी सत्तेचं दूध पाजलं तेच आज उलट्या करायला लागले आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका केली.