⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | महाराष्ट्र | नवनीत राणांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ललकारले, म्हणाल्या..

नवनीत राणांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ललकारले, म्हणाल्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आणि लीलावती रुग्णालयातील उपचारानंतर राणा दाम्पत्याने राजधानी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. दोन दिवस विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी आज दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना ललकारले आहे.

ज्यांनी विचार सोडले त्यांची येत्या 14 मे रोजी सभा आहे. त्यांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवण्यासाठी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत, असं सांगतानाच हिंमत असेल तर 14 तारखेच्या सभेत तुम्ही कुठून लढणार त्या मतदारसंघाची घोषणा करा. मी तुमच्या विरुद्ध लढण्यास तयार आहे, असं आव्हानच नवनीत राणा यांनी दिलं. तसेच आपल्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप यावेळी राणा दाम्पत्याने केला.

“बाळासाहेबांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. त्यांना पदाची लालसा नव्हती. तर तुम्हाला पदाची लालसा आहे तर तुम्ही निवडणूक लढा. हे मात्र नक्की की मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणार, फक्त १४ तारखेच्या सभेत कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढणार हे स्पष्ट करा, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.यावेळी त्यांनी आपण कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं नसल्याचंही स्पष्ट केलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.