जळगावात शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले ‘गाजर’

सप्टेंबर 21, 2022 10:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पाळधी आणि मुक्ताईनगर येथे दौरा केला. मात्र, जळगाव जिल्ह्यासाठी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. या विरोधात जळगाव जिल्ह्यात शिवसेना आक्रमक झाली असुन शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांना गाजर दाखवण्यात आले.

shivsena 4 jpg webp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जळगाव जिल्हा दौरा केला. जळगाव जिल्हा दौऱ्यामध्ये जिल्ह्यासाठी कोणतेही घोषणा मुख्यंमत्री शिंदे यांनी केली नाही. यामुळे जळगाव जिल्हा वासियांना मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांनी गाजर दाखवल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटातील नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी आक्षेपार्ह्य विधान केले होते. या विधाना विरोधात संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. याचबरोबर नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव जिल्हादौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याला काहीही दिले नाही. यामुळे जळगाव जिल्ह्याला शिंदेने गाजर दाखवलं म्हणून शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेने जळगाव शहरांमध्ये गाजर दिखवा आंदोलन केलं.

यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी हातात गाजर घेऊन ‘तुम्ही जळगाव जिल्ह्याला दिलं काय गाजर गाजर’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. शहर महानगरपालिकेच्या 17 मजली इमारती समोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरडकर, अल्पसंख्यांक प्रमुख झाकीर पठाण, मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, डॉ.जुबेर शेख, अंकुश कोळी, किरण भावसार, मतीन सैय्यद, बाळा कंखरे, निलेश देशमुख, फरीद खान, मनीषा पाटील, निलू इंगळे, नीता संगोळे, शोएब खाटीक, भास्कर पाटील, आबीद शेख, इकबाल शेख, बॉबी चांगरे, जितू साळुंखे, विशाल वाणी, अंकित कासार, डॉ.मोहसीन, युनूस सैय्यद, रेहमान खाटीक, गुलाम मिर्जा, समीर पिंजारी, महेश ठाकूर, पूनम राजपूत, यश सपकाळे, शेखर शिंपी, लखन सांगीळे, विलास तायडे, दीपक बोरसे, विलास बारी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now