जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

.. तेव्हा गिरीशची चड्डी पतली झाली होती – आ.एकनाथराव खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । एका निवडणुकी वेळी सोनिया गांधी यांनी जामनेर मध्ये मोठी सभा घेतली होती. त्या सभेनंतर या गिरीशची चड्डी पतली झाली होती आणि तो रडत माझ्याकडे आला होता. म्हणाला होता शत्रुघ्न सिन्हा यांची मुक्ताईनगर मध्ये होणारी सभा आता जामनेर मध्ये घ्या. तेव्हा मी याला सहकार्य केलं होतं. अशी टीका आमदार एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.

याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, गिरीश महाजन यांना मुद्दाम एकनाथराव खडसे यांना विरोध करण्यासाठी मोठ केल जात आहे. आता आत्ता त्याचं नाव मोठं झालं आहे. आधी हे सर्व लोक माझ्या चपला उचलायचे. माझे पाय दाबायचे. तेव्हाचे दिवस हे विसरले आहेत. यांना सत्तेचा माज आला आहे. असेही एकनाथराव खडसे म्हणाले.

याचबरोबर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, मी चुना फक्त भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना लावला आहे. मी चुना भ्रष्टाचारांना लावला आहे. आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलताना ते म्हणाले , आज मुक्ताईनगर मध्ये जे जे आहे ते केवळ एकनाथराव खडसे मुळेच आहे. चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षात काहीच केलेलं नाही.

Related Articles

Back to top button